मधुमेह (Diabetes) हा एवढा गंभीर आजार आहे की तो एखाद्याला झाला तर त्या संबंधित समस्या आयुष्यभर मागे लागत राहतात.

डायबेटिज होण्याची कारणे

आनुवांशिकता 
डायबेटिज होण्याचे पहिले कारण म्हणजे आनुवांशिक. तुमच्या घरात एखाद्याला डायबेटिज झाला असेल तर तुम्हालाही तो आजार होण्याची शक्यता असते.

चुकीची जीवनशैली
आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. जे लोक व्यायाम करत नाहीत, त्या लोकांना जुने आजार होण्याचा धोका जास्त असतो. व्यायाम केला नाही, सारखं बसून राहिल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढत जातो. त्यामुळे शरीराची हालचाल करावी. व्यायाम करावा. रोज योगा करावा.

गोडं जास्त प्रमाणात खाणे
गोड खाणं सर्वांनाच आवडतं. परंतु त्यावर कंट्रोल हवं. जास्त गोड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. कारण कॅलरी वाढणे हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गोड खाणं कमी करावं.

लठ्ठपणा
तुमचं वजन वाढत असेल तर लगेच व्यायामाला सुरूवात करा. कारण वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं कठीण होतं आणि हळूहळू डायबेटिजचा धोका वाढत जातो.

डायबेटिज होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
रोज व्यायाम करा
शरीराचा हालचाल होऊ द्या
गोड खाणं कमी करा
चांगला आहार घ्या.
डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी घरगुती उपाय

बदाम तेलाचे आरोग्यवर्धक व सौंदर्यवर्धक फायदे