व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीच्या अभावी थकवा, सांधेदुखी, नजर कमजोर होणे, त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यच्या समस्या निर्माण होणे यांसारखे आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे पहिले लक्षण म्हणजे अत्यधिक थकवा जाणवणे. मात्र आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटमिन सी ची कमतरता दूर करू शकता. जाणून घ्या व्हिटॅमिन सी कोणत्या पदार्थांमध्ये आढळतो.

आवळा
आवळा हा ‘व्हिटॅमिन सी’चा खूप मोठा स्रोत आहे. आवळ्याचा विशेष गुणधर्म म्हणजे आवळा शिजवल्यानंतरही त्यातील ‘व्हिटॅमिन सी’ नष्ट होत नाही. पित्ताच्या त्रासावर आवळा अतिशय गुणकारी आहे. आवळ्यात अँटी ऑक्सीडंटस मोठ्या प्रमाणात असतात. आवळा शरीरातील पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे तारुण्य टिकून राहते.

संत्री
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. या फळाच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते. फायबर, व्हिटॅमिन-ए, पोटॅशिअम यासह इतर अनेक पोषक घटक असतात.

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ब्रोकोली अवश्य खावी. ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आढळतात. ब्रोकोली शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. ब्रोकोली खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पपई
पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.पपईमध्ये भरपूर अँटि ऑक्सिडंट असतात. नियमित पपई खाल्ल्याने थकवा आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते.पपईमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि तरुण बनते.

किवी
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे किवी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. किवीमध्ये विविध पौष्टिक घटक तसेच लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्हिटॅमिन सी आढळते.