प्रत्येकाला दीर्घायुष्य व्हावं असे वाटते. परंतु फक्त वाटून दुर्घयुषी होणं तस कठीण. मात्र तुमच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही तुम्हाला आहे असलेले आयुष्य वाढवू शकतात आणि ते फार काठीणही नाही. कारण तुमच्या काही आरोग्यदायी सवयी तुम्हाला तुमचे आयुष्य किमान 10 वर्षांपर्यंत वाढवण्यास मदत करतील. कोणती आहे ती ‘हेल्दी लाईफस्टाईल’ जाणून घेऊयात.
हेल्दी आहार घ्या :
टीओआय मध्ये छापून आलेल्या अहवालानुसार जर तुम्ही दीर्घायुषी राहू इच्छित आहात तर तुमच्या आहारात पोषक तत्व अधिक असणे आवश्यक आहे. तसेच फळे, सुका मेवा याचा रोजच्या आहारात समावेश असावा. 30 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तींनी या पदार्थांचे सेवन आपल्या आहारात आवर्जून ठेवावे. करण हे तुम्हाला अनेक गंभीर आजारापासून दूर ठेवून तुम्हाला दीर्घायुषी ठेवतील.
शरीराला कोवळे ऊन द्या :
आज काल जीवनशैली अशी झाली आहे की अनेकजण कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. परंतु केवळ घरात आणि ऑफिसमध्ये बसून आपण आपल्या शरीराला आवश्यक चांगले घटक पुरवू शकत नाही. त्यामुळे रोज सकाळी उठून काहीवेळ कोवळ्या उन्हात घालवावा. यामुळे तुमची हाडे मजबूत तर होतातच आणि शरीराची ऊर्जाही वाढते. त्यामुळे सकाळी अर्धातास तरी कोवळे उन्हात उभे राहावे.
प्रॉसेस्ड फूड कमी खावे :
जर तुम्ही प्रॉसेस्ड फूड आणि रेड मीट जास्त खत असाल तर ते नियंत्रणात ठेवणे तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. यात कोलेस्ट्रॉल आणि अपायकारक घटक असतात जे तुमच्या शरीराला आणि हृदयाला त्रासदायक ठरू शकतात. तसेच या पदार्थांचे अधिक सेवन कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.