अनेकांना दुपारी जेवण केल्यावर सुस्ती येऊन झोप घेऊशी वाटते. अनेक जण दुपारी जेवल्यावर 2 ते 3 तास झोप घेतात. परंतु तुम्हाला माहितीये का? की दुपारी जेवल्यानंतर झोपल्यावर शरीरात वाताचे प्रमाण वाढतो. विज्ञानही हेच सांगते. आपल्या शास्त्रात म्हंटले आहे की, ऊर्जा देणारा सूर्य तळपत असेल तर अशा परिस्थितीत आपण झोप घेणे योग्य नाही. आणि उन्हाळ्यात तर जेवल्यावर दुपारी झोप घेणे योग्य नाहीच.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुपारी झोपेनंतर अन्न पचत नाही. यामुळे तुम्हाला गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या जाणवतात. तसेच दुपारी जेवून झोपल्यानंतर लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याच्या धोका बळावतो. टोकियोतील एक अब्यास सांगतो की, दुपारी जेवल्यांनंतर एक तास झोपणाऱ्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका तब्बल 45 टक्क्यांनी वाढतो.

दुपारी जेवल्यानंतर झोपण्याचे दुष्परिणाम :
1. दुपारी जेवून झोपल्याने पचन दोष निर्माण होतो. त्यामुळे चरबी वाढण्याच्या प्रमाणात वृद्धी होते.
2. जेवून झोपल्याने शरीरातील कफ दोष वाढतो. त्यामुळे शरीरात पस निर्माण होऊ शकतो. जखम चिघळू नदेखील शकते.
3. जेवून झोपल्याने पचन क्रिया शरीराच्या नियंत्रणाबाहेर जाते. शरीराला हालचाल नसल्याने त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढते.
4. दुपारी जेवून लगेच झोपल्याने शरीरात पित्त दोष आणि कफ वाढतो. त्यामुळे अंगाला खाज येणे, पुरळ येणे असे प्रकार घडतात. तसेच यामुळे रक्तही दूषित होऊ शकते.