महिलांसाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते तसेच पुरुषांनाही त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. आणि त्वचेकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्याही जाणवू शकतात. उन्हाळयात तर अधिक. अशावेळी त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक बनते. त्यामुळे पुरुषांनी स्वतःला कसे ग्रूमिंग ठेवावे आपण पाहणार आहोत.
त्वचेला एक्सफोलिएट करा :
स्किन एक्सफोलिएशनच्या मदतीने तुम्ही मृत कोशिका त्वचेतून हटवू शकतात. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. त्यामुळे चेहऱ्यावर प्राकृतिक चमक देखील येते. तसेच पुरुष दिवसाआड स्क्रब देखील करू शकतात.
फेस वॉश वापरणे :
चेहऱ्यावर साबणाचा वापर करण्याऐवजी आपण आपल्या त्वचेनुसार फेस वॉशचा वापर केल्यास त्वचा अधिक कोमल आणि प्रॉब्लेम फ्री होते. तसेच तुम्ही त्वचा तेलकट असल्यास ऑईल स्किन साठी असलेल्या फेस वॉशचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्यावर फोड येणार नाहीत.
हेअर ट्रीमिंग :
जर तुम्हाला दाढी आणि मिशा ठेवणे आवडत असेल तर तुम्ही त्या नियमित ट्रिम करणे आवश्यक आहे. केसांनाही दार 15 दिवसांनी ट्रिम करणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला, व्यक्तिमत्वाला तुमची हेअर स्टाईल, दाढी शोभून दिसेल.
सनस्क्रीनचा वापर :
सनस्क्रीनचा नियमित वापर महिला आणि पुरुषांनी केलाच पाहिजे. सूर्याच्या कडक उष्णतेने आपल्या त्वचेच्या रंगाचे आणि टेक्सचरचे नुकसान होते. त्वचेलनानेक्ट ऍलर्जी आणि सन बर्नही होतो. त्यामुळे सनस्क्रीनचा नियमित वापर पुरुषांनीही केला पाहिजे.