उन्हाळ्यात त्वचा काळी पडण्याचे प्रकार वाढतात. हे टॅनिंग कमी करण्यासाठी अनेक जण ब्लिचचा वापर करतात. परंतु सतत ब्लिच केल्याने तुमची त्वचा कायमची काळी पडू शकते. त्यामुळे अशा केमिकल असलेल्या उत्पादनाऐवजी तुम्ही घरगुती डिटेन फेस मास्क वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा टोन नक्की सुधारेल.
कोरफडीचा गर :
कोरफडीच्या गरामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ऍसिड, बी 1, बी 2, बी 12 याचे प्रमाण भरपूर असते. याचा डिटेन मास्क बनवण्यासाठी झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर चेहऱ्यावर अथवा इतर ठिकाणी त्वचेवर लावा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. चांगल्या परिणामांसाठी हा उपाय रोज करता येईल.
टोमॅटो :
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे भरपूर असते. यामुळे त्वचेला पोषण तत्व मिळतात. टोमॅटो मॅश करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर पाण्याने धुवून टाकावी. असे आठवड्यातून दोनदा केल्यास जास्त चांगला परिणाम दिसेल. यामुळे त्वचा ब्राईट होऊन त्वचेवर ग्लोव येतो.
मध :
मधामध्ये फ्रक्टोजचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय यात कार्बोहाइड्रेट, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, सी हे देखील भरपूर असते. मध डिटेन मास्क म्हणून वापरण्यासाठी एक चमचा मधामध्ये दोन चमचे दही मिसळावे. ते एकमिश्र करून 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावावे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. चांगल्या परिणामांसाठी असे मास्क रोज लावल्यास चांगला परिणाम मिळेल.