केवळ उन्हात गेल्यानेच त्वचा काळवंडते ( Skin tan ) असं काही नाही. अगदी घरात राहूनही त्वचा टॅन होऊ शकते. जाणून घ्या कोणकोणत्या कारणाने त्वचा टॅन होऊ शकते-
चुकीची आहारपद्धती
फास्ट फूड, तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडते.पोट साफ नसेल तर त्याचे परिणाम त्वचेवरही दिसतात. तसेच गोड पदार्थ, तेलकट पदार्थ, फॅट असलेले पदार्थ तुमच्या त्वचेवरील हायड्रेशन कमी करतात. त्यामुळे त्वचा टॅन, कोरडी, शुष्क किंवा अति तेलकट दिसू लागते. ( Skin tan )
ब्लॅक हेड्स
स्किन पोअर्समध्ये घाण साचून चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स येऊ लागतात. त्यामुळे तुमची त्वचा टॅन दिसते. ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी त्वचेला नियमित स्क्रब, मॉश्चराईज केले पाहिजे.
‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळवा हाय ब्लडप्रेशरवर नियंत्रण
अपुरी झोप/उशिरा झोपणे
अपुऱ्या झोपेमुळे, उशोरा झोपल्याने त्वचेचे तेज कमी होते. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात. परिणामी त्वचा काळवंडते.
आळस
त्वचेची निगा न राखल्यानेही त्वचा टॅन होऊ शकते. त्यासाठी त्वचेची निगा राखताना आळस न करता क्लिनिंग, मॉश्चरायझिंग आणि टोनिंग करावे.