दात पांढरेशुभ्र असतील, तर व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसतं. दातांची निगा राखण्यासाठी महागड्या उपचारांपेक्षा अनेक घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि तेही कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय! खाली दिलेले हे उपाय तुमचे दात नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ आणि पांढरे बनवण्यास मदत करू शकतात. ( Home Remedies for Sparkling White Teeth)
पांढऱ्या दातांसाठी घरगुती उपाय
🔹 केळीची साल (Banana Peel)
केळी खाल्ल्यानंतर तिची साल दातांवर ५ मिनिट हलक्या हाताने घासा. केळीच्या सालीतील खनिजे दात स्वच्छ करतात.
🔹 बेकिंग सोडा व लिंबाचा रस ( Baking Soda & Lemon Juice)
एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडा लिंबाचा रस मिसळून दात घासावेत. आठवड्यातून एकदाच करा.
🔹 तुळशीची पावडर ( Tulsi (Basil) Powder)
तुळशीची पाने सावलीत वाळवून पावडर तयार करा आणि ती टूथपेस्टमध्ये मिसळा. ही पावडर दातांचे आरोग्य टिकवते.
🔹 लिंबाची साल (Lemon Peel)
लिंबाची साल दातांवर चोळा आणि नंतर तोंड स्वच्छ धुवा. लिंबातील ब्लीचिंग घटक दात उजळतात.
🔹 लिंबू व संत्र्याची साल पावडर (Dried Citrus Peel Powder)
या दोन्हींची साल वाळवून त्याची पावडर बनवा आणि ती दातांवर घासा. नैसर्गिक क्लीनिंग एजंट्स म्हणून काम करते.
🔹 ताज्या भाज्या आणि कोरडे मेवे ( Fresh Veggies and Dry Fruits)
गाजर, ऊस, मनुके, काजू, बदाम यांचे नियमित सेवन केल्यास दात स्वच्छ राहतात.
🔹 मीठ आणि मोहरी तेल ( Salt & Mustard Oil)
थोड्या मिठात २-३ थेंब मोहरीचे तेल टाकून दात घासा. हा उपाय दात मजबूत करतो आणि चमक वाढवतो.
🔹 ऑलिव्ह ऑईल मसाज (Olive Oil Massage)
कापसाच्या मदतीने थोडेसे ऑलिव्ह ऑईल दातांवर लावा. हे तोंडातील बॅक्टेरिया कमी करतं आणि दात स्वच्छ करतो.
🔹 अननसाची फोड (Pineapple Slice)
अननसाच्या फोडीने दातांवर हलके चोळा. यातील एंजाइम्स दातांचे डाग कमी करतात.
🔹 कडुनिंबाचा वापर (Neem Stick or Powder)
कडुनिंबाच्या काडीने किंवा पावडरने नियमित ब्रश करा. हे दातांची सुरक्षा वाढवते.
🔹 स्ट्रॉबेरी व बेकिंग सोडा (Strawberry & Baking Sod)
स्ट्रॉबेरी पेस्टमध्ये बेकिंग सोडा घालून मिश्रण तयार करा आणि ब्रशने दात घासा. नैसर्गिक व सुरक्षित उपाय आहे.
(टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सर्व घरगुती उपाय नैसर्गिक आहेत, मात्र अतीप्रमाणात किंवा अतिजोराने घासल्यास इनेमलला हानी होऊ शकते. त्यामुळे सौम्यपणे वापर करावा आणि दातांच्या सततच्या तक्रारी असल्यास दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)