टोमॅटो केचप बनवण्यासाठी टोमॅटो गरम पाण्यात टाकून ते उकळले जाते. यानंतर त्याच्या बिया आणि कातडे काढून त्याला शिजवले जातात. यामध्ये भरपूर साखर, मीठ, फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो.या संपूर्ण प्रक्रियेस अनेक तास लागतात. त्यामुळे टोमॅटोचे पोषक तत्व नष्ट होतात. पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राइज या सारख्या फास्ट फूडसोबत टोमॅटो केचप खाणे अनेकांना आवडते. मात्र टोमॅटो केचप अधिक प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या टोमॅटो केचप अधिक प्रमाणात खाण्याचे शरिरावर होणारे दुष्परिणाम –

लठ्ठपणा

टोमॅटो केचपचा अतिवापर केल्याने शरीरात लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. त्यात मोठ्या प्रमाणात साखर आणि अन्न परीरक्षक आढळतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. तसेच ते शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते.

ऍसिडिटी
केचप बनविण्यासाठी फ्रुक्टोज कॉर्न सिरपचा वापर केला जातो, ज्यामुळे पोटात जळजळ आणि गॅसची समस्या वाढू शकते. टोमॅटो केचपच्या अति वापरामुळे ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

ॲलर्जी

केचपमध्ये हिस्टॅमिन केमिकल जास्त असते. त्यामुळे केचप जास्त खाल्ल्याने शरीरात ॲलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.