अनेकांना साखर खाल्ल्यावर तरतरी आल्यासारखे वाटते. मात्र याच साखरेचे अधिक प्रमाणात सेवन शरीरावर दुष्परिणाम करते. अधिक प्रमाणात साखर खाल्यामुळे लठ्ठपणा, हृदयाचा आजार, कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता, अल्झायमर सारखे आजार होण्याचे शक्यता असते. साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. जाणून घ्या अधिक प्रमाणात साखर खाल्ल्याने होणारे साईड इफेक्ट्स –

साखरेचे अधिक सेवन केल्याने हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. या कारणाने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

साखरेचे अधिक सेवन केल्याने हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.

साखरेचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. कॉलेजने हा त्वचेसाठी महत्वाचा घटक आहे. शरीरात साखर कोलेजेन प्रथिनाला चिकटते. यामुळे, शरीरात अशी प्रणाली तयार होण्यास सुरुवात होते जी हळूहळू कोलेजन प्रथिने काढून टाकण्यास सुरुवात करते. यामुळे आपल्या शरीरात उपस्थित घटक आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास सक्षम राहत नाही. मग त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि अकाली सुरकुत्या त्वचेवर दिसू लागतात. यामुळे मुरुम होऊ शकतात आणि वृद्धत्व वाढू शकते.

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका असतो. जास्त साखर आपल्या शरीरात साखरेची पातळी वाढवते. यामुळे ग्लूकोज संपूर्ण मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि स्मरणशक्ती कमी होणे सुरू होते.

गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने इंसुलिनच्या प्रतिकारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि नंतर टाइप -2 मधुमेह होण्याचा धोका देखील वाढतो.

साखरेचे अधिक सेवन केल्याने वजन वेगाने वाढते.

जेव्हा आपण साखर खातो तेव्हा ते यकृताचे कार्य वाढवते आणि तणाव वाढतो. यामुळे, लिपिड्स जास्त प्रमाणात शरीरात तयार होऊ लागतात आणि यकृत समस्येचा धोका वाढतो जास्त साखरेचा आहार यकृताला अधिक चरबी साठवण्यास भाग पाडतो. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतात.

साखरेचे अधिक सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढतं. जास्त साखर खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम अनहेल्दी कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवर होतो. यामुळे हाय बीपीची समस्या होते. तसेच ब्लॉकेज, हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो.