बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. मात्र सकाळी उपाशी पोटी चहा प्यायलामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागू शकतात. जाणून घ्या उपाशीपोटी चहा पिल्याने कोणता समस्या निर्माण होऊ शकतात –

पोटाचे आरोग्य बिघडते
चहातील काही घटक हे पचनसंस्थेवर परिणाम करतात, त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. रिकाम्या पोटात चहा गॅस्ट्रिक म्युकोसा वाढवतं. त्यामुळे जठरसंस्थेवर परिणाम होऊन भूक मंदावते. आपल्याकडे विशेष करून दुधाचा चहा केला जातो. दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते. ज्यामुळे सकाळी उपाशीपोटी चहा पिल्यामुळे लॅक्टोज शर्करा लॅक्टिक आम्लामध्ये रुपांतरीत होते. ज्यामुळे पोटामध्ये गॅस व ऍसिडिटीची समस्या वाढते तसेच पोटफुगीचा देखील त्रास सुरु होतो. तसेच रिकाम्या पोटी आलंयुक्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या उद्भवते.

थकवा येतो, चिडचिड वाढते
रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने थकवा येतो, तसंच चिडचिडेपणा वाढतो.

ऍसिडिटी
चहामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल, अल्कलाईन तत्व आणि टॅनिन असतं, त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पिल्यानंतर काहींना पित्त होऊन मळमळतं तसेच छातीमध्ये जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.

युरीन प्रॉब्लेम
जे लोक उपाशीपोटी सकाळी चहा पितात त्या लोकांना दिवसभरात जास्त प्रमाणात लघवीला जावे लागते.

ब्लडप्रेशरवर दबाव येऊ शकतो
चहामध्ये कॅफेन व टॅनिन हे उत्तेजक घटक असतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा प्यायल्यास हे कॅफेन व टॅनिन शरीरातील ब्लडप्रेशरवर दबाव आणते.

टीप – वरील समस्या सर्वांनाच लागू होतील असं नाही. नेहमीच उपाशीपोटी चहा पीत असाल तर त्याची शरीराला देखील सवय झालेली असते. मात्र वरील समस्या कधीतरी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उपाशीपोटी चहा पिण्यापेक्षा चहासोबत नाश्ता करावा किंवा बिस्किट, ब्रेड, टोस्ट यांसारखे पदार्थ खावेत.