चहा हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. चहा पिल्यामुळे अनेकांना स्फूर्ती उत्साह आल्यासारखं वाटत. योग्य प्रमाणात चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चहा जरी अनेक गोष्टींवर गुणकारी असला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारकच असतो. त्यामुळे चहाचे अति सेवनही करू नये. असं म्हणतात चहाला वेळ नसते, पण उन्हाळ्यात चहा वेळ बघूनच प्यावा. चहाप्रेमींना चहा कधीही दिला तरी ते नाही म्हणत नाहीत. मात्र तरीही उन्हाळ्यात दुपारी किंवा दुपारनंतर ४-५ वाजता चहा पिणे टाळावे. जाणून घ्या दुपारी चहा पिल्याने शरीरावर काय परिणाम होतो –
दुपारच्या वेळी वातावरण अधिक उष्ण असते, शरीराचेही तापमान वाढलेले असते अशातच चहा पिला तर शरीराचे आणखी तापमान वाढते. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. शरीराची उष्णता वाढल्याने तोंड येणे, घामोळं, पिंपल्स, अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात.
तसेच चहाचे अतिसेवन झाले तर पचन प्रक्रिया मंदावते. संपूर्ण पाचन तंत्र विस्कळीत होते. आतड्यांवर परिणाम होतो. ॲसिडिटी, मळमळ, छातीत जळजळ होते.
उन्हाळ्यात अति चहा पिल्याने झोप कमी होते. झोपेच्या अभावामुळे शरीरात थकवा, राग, चिडचिड आणि तणाव वाढतो.