श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करत असतात. उपवास करताना आरोग्याचाही विचार करणे तितकेच आवश्यक असते. उपवासाच्या काळात शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या टिप्स या उपवास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
पाण्याची कमतरता होऊ देऊ नका (Stay Hydrated)
उपवासाच्या काळात शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून किमान 6-8 ग्लास पाणी अवश्य प्यावे.
ऊर्जेचा पुरवठा फळांमधून करा (Get Energy from Fruits)
उपवासात शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाणे फायद्याचे ठरते.
रिकाम्या पोटी असिडिटी वाढू शकते ( Empty Stomach Can Cause Acidity)
उपवासात खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने फळं खाणे आवश्यक आहे.
सुका मेवा खा (Eat Dry Fruits)
बदाम, अंजीर, खजूर, अक्रोड यासारखे सुके मेवे शरीराला तात्काळ ऊर्जा देतात. तसेच उपवासामुळे येणारा अशक्तपणा दूर ठेवतात.
न्याहारी (Breakfast)
उपवासाच्या दिवशी न्याहारीत दूधासोबत फळे किंवा रात्री दूधात भिजवलेले बदाम खाणे उत्तम ठरते. यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने व ऊर्जा मिळते.