पुणे : पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या अत्याचारांच्या घटनांवरून पुन्हा एकदा शहरातली महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशीच एक धक्कदायक घटना पुण्यातून समोर आली आहे. तरूणीच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नराधामाने तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. पण, तिने भांडण झाल्याच्या रागातून नकार दिला. त्यावेळी तरुणाने तिचे हात-पाय कपडयाने बांधुन गांजा ओढुन त्याचा धुर तिच्या नाका-तोंडात सोडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २२ वर्षी पिडीत तरूणीने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे प्रेम संबंध होते. पण, श्रवणचे दुसर्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झालेले होते. दरम्यान, श्रवण याने घराचा दरवाजा लावुन पिडीत तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तरूणीने नकार दिला. मात्र, त्यानंतर देखील श्रवणने पिडीत तरूणीचे हात कपडयाने बांधून गांजा ओढुन त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गांजाचा धूर नाकात गेल्याने तरूणीला गुंगी आली. अंकशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक तोरगल करीत आहेत.