चिक्की हा गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगला उपयुक्त ठरतो. तीळ व गुळापासून बनलेली चिक्की खाणे चांगले असते. चिक्की खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे होतात.
1) गूळ आणि तीळ वापरून तयार केलेली चिक्की ही कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामुळे हाडं मजबूतीसाठी तिळाची चिक्की खावी.
2) तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तिळाची चक्की खा. तिळाच्या चिक्कीत ‘सेसमोलिन’ हा गुणधर्म असतो. तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
3) पचशक्ती सुधरवायची असेल तर आहारात तिळाच्या चिक्कीचा समावेश करा. कारण तिळाच्या चिक्कीत फायबर असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
4) तिळाची चिक्की खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
5) शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर तिळाची चक्की नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.
6) तुम्हाला जर तजेलदार त्वचा हवी असेल तर तिळाची चक्की खा. कारण तजेलदार त्वचेसाठी तिळाची चिक्की फायदेशीर आहे. तिळात झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचा दर्जा सुधारण्यात मदत होत असते.