ऋतूबदल, योग्य आहार आणि काळजी न घेणे, शरीरात व्हिटॅमिनची कमतरता यांसारख्या कारणांमुळे केस गळतीची समस्या निर्माण होते. केसगळती कमी करण्यासाठी काही बिया गुणकारी आहेत. जाणून घ्या केसगळती कमी करण्यासाठी आहारात कोणत्या बियांचा समावेश करावा –
जवसाच्या बिया
जवसाच्या बिया खाल्ल्याने केसांना चमक येते. यामुळे केस निरोगी होतात.
चिया सीड्स
कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम समृद्ध असलेल्या चिया बियांना सुपरफूड म्हणतात. त्यामुळे केस निरोगी राहतात आणि गळणे कमी होते.
टरबूजाच्या बिया
टरबूजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि तांबे मुबलक प्रमाणात आढळतात. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.
खरबूजाच्या बिया
झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात. खरबूजाच्या बियांमध्ये झिंक, पोटॅशियम, मॅंगनीज, सोडियम, कॅल्शियम, लोह, प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, जस्त भरपूर असते. हे केस गळण्याच्या समस्येवर गुणकारी आहे. भोपळ्याच्या बियांचे सेवन केस वाढीसाठी उपयुक्त आहे.