भारतीय परंपरेत चंदनाला अत्यंत पवित्र आणि औषधी महत्त्व आहे. आयुर्वेदात याचा वापर शारीरिक, मानसिक आणि त्वचेसंबंधित आजारांवर केला जातो. चंदनाचा थंडावा शरीराला आराम देतो, त्वचेला सौंदर्य प्रदान करतो आणि मनाला शांती मिळवून देतो. जाणून घ्या चंदनाचे आरोग्यदायी फायदे –
शरीर ताजेतवाने होते (Refreshes the Body)
चंदन पावडर थंड पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास संपूर्ण शरीराला थंडावा मिळतो. यामुळे दिवसभरातील थकवा दूर होतो आणि ताजेतवाने वाटते.
कपाळावर चंदन लावल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
खाज येण्यावर रामबाण उपाय (. A Natural Remedy for Itching)
शरीराला खाज येत असल्यास किंवा त्वचेवर सूज आल्यास, चंदनाचा लेप लावल्याने आराम मिळतो. यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे त्वचेच्या रॅशेसवरही ते त्वचेच्या रॅशेसवरही ते उपयुक्त आहे.
उन्हाळ्यातील डोकेदुखीपासून आराम (Relief from Headaches in Summer)
चंदनाचा सुगंध मनाला शांत करतो आणि अस्वस्थता कमी करतो. चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा असतो, म्हणून ते कपाळावर लावल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो आणि स्नायूंचा ताणही कमी होतो.
त्वचेसाठी गुणकारी (Beneficial for Skin)
चेहऱ्यावर मुरूम असतील किंवा त्वचा कोरडी वाटत असेल, तर गुलाबपाण्यात चंदन पावडर मिसळून चेहऱ्यावर लेप लावा. हा लेप त्वचा मऊ, तजेलदार आणि मुरूमविरहीत करतो.
चेहरा निस्तेज आणि काळवंडलेला वाटत असेल, तर चंदनाचा लेप चेहऱ्यावर नियमित लावावा. यामुळे त्वचेतील अशुद्धता दूर होते आणि चेहऱ्यावर स्वच्छ, उजळ चमक येते.
मानसिक शांती ( Mental Peace)
चंदनाला मोहक वास येतो, ज्याच्या वासामुळे मेंदूच्या रासायनिक पातळीची असामान्य हालचाल कमी होते आणि आपल्याला चांगले वाटते. आयुर्वेदानुसार चंदनाचा सुगंध मानसिक शांती प्रदान करण्यासही मदत करतो.
अरोमाथेरपीमध्ये चंदनाचा वापर ध्यान आणि शांत वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो.
एकाग्रता वाढते ( Improves Concentration)
कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने थंडावा मिळतो आणि तणावही कमी होतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते आणि एकाग्रता वाढते. तसेच चंदनाचा सुगंधाने तुम्हाला आराम मिळतो.
डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी होतात (Reduces Dark Circles)
ताण-तणाव, झोपेची कमतरता यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. अशावेळी, चंदनाचा थोडासा लेप डोळ्यांखाली लावल्याने त्या वर्तुळांवर प्रभावी परिणाम होतो.