मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. हेच स्वयंपाक घरातील मीठ जेवणाची रुची वाढवण्याबरोबरच सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त आहे. जाणून घ्या मिठाचे सौंदर्यवर्धक फायदे आणि त्याचा कसा वापर करावा याविषयी माहिती –

डेडस्कीन हटविण्यासाठी मिठाचा स्क्रब म्हणून करा वापर 
डेडस्कीनमुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावरील डेडस्कीन हटविण्यासाठी मिठाचा स्क्रब म्हणून वापर करावा. ऑलिव्ह ऑइलमध्ये मीठ घालून पेस्ट बनवा. आणि या पेस्टने त्वचेवर गोलाकार मसाज करा. ५ मिनिटांनी धुवून टाका.
किंवा मीठात ऑलिव्ह ऑईल, लव्हेंडर ऑईल, बदाम तेल घालून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळेही डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते.

त्वचा मुलायम आणि मऊ बनते
२ चमचे मिठामध्ये ४ चमचे ऑरगॅनिक मध घाला आणि पेस्ट बनवा. ती पेस्ट त्वचेवर लावा. १०-१५ मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मुलायम आणि मऊ बनते.

दात चमकदार बनवा
१ चमचा मिठात २ चमचे बेकिंग पावडर घाला. या मिश्रणाने टूथब्रशने दात घासा. यामुळे दातांवरील डाग दूर होवून दात चमकदार होतात.

नखे मजबूत बनवा
अर्धा कप गरम पाण्यात १ चमचा मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. त्या मिश्रणात १० मिनिटे हात बुडवून ठेवा आणि नंतर हात धुवा.यामुळे नखे मजबूत बनतात आणि कुटीकल्स मऊ होतात.

श्वासाची दुर्गंधी दूर होते
मीठाच्या पाण्याने चूळ भरल्याने तोंडातील बॅक्टेरीया नष्ट होतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते.