माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : अधिक मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ताक, मासे मॅरिनेट करण्यासाठी सैंधव मीठ वापरू शकतात. पांढरे मीठ आणि सैंधव मीठ यांत काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यातील कोणत्या मीठाच्या सेवनाचे तुमच्या आरोग्याला फायदे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? (Why Is Rock Salt Better)
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
जागतिक सरासरीनुसार साधारण व्यक्ती दिवसभरात १०. ८ ग्रॅम मीठाचे सेवन करते. दिवसभरात ५ ग्रॅमहून अधिक मीठ खाणे धोकादायक ठरू शकते. जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
पांढरे मीठ व सैंधव मीठ यातील फरक
सैंधव मीठ व पांढऱ्या मिठाच्या चवीत फारसा फरक नसतो. मात्र, जे लोक आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेतात ते सैंधव मीठ वापरण्याला प्राधान्य देतात. सैंधव मीठ हे गुलाबी तर साधे मीठ हे पांढऱ्या रंगाचे असते.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
सैंधव मीठ का उत्तम?
सैंधव मीठ हे मुख्यतः समुद्र किंवा खाऱ्या पाण्याच्या ओढ्याने बनवले जाते. या मीठाला बनवताना फार प्रक्रिया केली जात नाही व नैसर्गिक स्वरूपातच सेवन केले जाते.
पांढऱ्या मिठाने शरीरावर काय परिणाम होतो?
पांढरे मीठ तयार करण्यासाठी रिफाईंड पद्धतीचा वापर केला जातो. यात ९५ टक्के अधिक सोडियम असते. याच कारणाने पांढरे नियमित मीठ हे आरोग्यास हानिकारक मानले जाते. पांढऱ्या मीठाचे सेवन अधिक केल्यास यातून उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता असते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)