सौंदर्य आणि आरोग्याचा संगम म्हणजे केशर (Saffron) . केशर हा एक बहुपयोगी, सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेला मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा आयुर्वेदामध्ये आणि पारंपरिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले केला जातो. केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे, म्हणूनच त्याला ‘रेड गोल्ड’ असेही म्हटले जाते. जाणून घ्या केशर खाण्याचे फायदे –
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
केशरमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
केशरच्या वापरामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते आणि इतर रक्तपेशींच्या पातळीवरही परिणाम होत नाही. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
तणाव आणि मानसिक आरोग्य सुधारते
नैराश्य व तणाव कमी करण्यासाठी केशर उपयुक्त ठरते.
केशरमध्ये क्रोसेटिन आणि क्रोसीन हे घटक असतात जे मूड सुधारण्यात मदत करतात.
पचनक्रिया सुधारते
केशर खाल्ल्याने पचन सुधारते, अपचन, गॅस व अॅसिडिटी यावर आराम मिळतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
केशर त्वचेला तेजस्वी बनवते. त्यामुळे अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केशराचा वापर केला जातो.
हृदयासाठी फायदेशीर
केशर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.
त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
दृष्टी सुधारते
नियमित केशर सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते, विशेषतः वृद्ध वयात होणाऱ्या दृष्टीदोषांपासून संरक्षण मिळते.
महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
मासिक पाळीचे त्रास, पोटदुखी, मूड स्विंग्स यावर केशर आराम देते.
केशराचे सेवन करताना’ही’ काळजी अवश्य घ्या
केशर नेहमी मर्यादित प्रमाणात घ्यावे. दैनंदिन २-३ तंतू पुरेसे असतात .केशराचे अतिसेवन केल्यास उलटी, डोकेदुखी, किंवा शरीरात उष्णता वाढू शकते. गरोदर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केशर घ्यावे.