सर्वांना चहा प्यायला आवडतो. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा लागतो. चहा पिऊनच सगळे दिवसाची सुरूवात करतात. तसेच अनेकांना चहासोबत काहीतरी खाण्याचीही आवड असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का चहासोबत काही पदार्थ खाऊ नयेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची नावे सांगणार आहोत जे चहासोबत खाऊ नयेत.

– चहासोबत बेसनाचे पदार्थ कधीच खाऊ नयेत. म्हणजे भजी, वडा हे चहासोबत खाऊ नये. त्याचे कारण म्हणजे हे पदार्थ खाल्ले तर पोट बिघडू शकते. तसेच पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

– दुधाचा चहा पित असाल तर आंबट पदार्थ खाऊ नयेत. दुधाच्या चहासोबत लिंबाचे सेवन करू नये. याचा मोठा परिणाम शरीरावर होऊ शकतो.

– चहासोबत सॅलड, उकडलेली अंडी, मोड आलेली कडधान्यं अशा कच्च्या पदार्थांचं सेवन करू नये.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे चहासोबत कधीही कोल्ड पदार्थ पिऊ नका. कारण त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. चहासोबत थंड पदार्थ घेतल्याने पचनक्रिया बिघडू शकते.

– चहा पिताना हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. अनेकांना चहासोबत हिरव्या पालेभाज्यांचं सॅलड खाण्याची सवय असते. परंतु हे शरीरासाठी हानिकारक असते. जर तुम्हाला चहानंतर पालेभाज्या खायच्या असतील तर काही अंतर ठेवून त्याचे सेवन करा.

– चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे सेवन करु नये.