झोप ही सर्वांच्या आवडीची असते. सर्वांना झोपायला आवडते अन् सकाळी लवकर उठूही वाटत नाही. परंतु शरीरासाठी सात ते आठ तासांची झोप गरजेची आहे. त्यापेक्षा जास्त झोपल्याने शरीराला आणि आरोग्याला धोक्याची घंटा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का तुमच्या झोपेच्या पद्धतीने खूप धोके निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झोपेच्या पद्धतीबाबत सांगणार आहोत.
झोपायची सर्वात चांगली पद्धत कोणती, सर्वात चुकीची पद्धत कोणती याबाबत आज आपण जाणून घेऊ
– झोपेची सर्वात योग्य आणि चांगली पद्धत म्हणजे सरळ झोपणे. ज्यामध्ये तुमच्या पाठीचा कणा, डोकं आणि कंबर सरळ राहते.
– झोपेची आणखी एक चांगली पद्धत म्हणजे एका कुशीवर झोपणे. कारण एका कुशीवर झोपल्यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो. याने तुमची मान, पाठ आणि खांदा सरळ राहतो.
– पाठीवर झोपणेही चांगले आहे. त्यामुळे तुमच्या पाठीचा कणा सरळ राहतो.
– झोपेची सर्वात चुकीची पद्धत कोणती तर ती म्हणजे पोटावर झोपणे आणि छातीवर झोपणे. तुम्ही जर असे झोपलात तर तुमच्या फुफुसांवर आणि छातीवर प्रेशर येऊन तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. तसेच याचा आणखी परिणाम म्हणजे शरीरातील रक्तपुरवठ्यावर होणारा परिणाम होतो. त्यामुळे पोटावर आणि छातीवर झोपू नये.