तांदळाच्या पिठ त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी आणि सौंदर्यवृद्धीसाठी मदत करते. जाणून घ्या त्वचेच्या विविध समस्यांवर तांदळाचे पीठ कसे उपयोगी आहे या विषयी –
डार्क सर्कल्स
दोन चमचे तांदळाच्या पिठात अर्ध पिकलेलं केळ आणि एक चमचा दुधाची साय मिसळून घ्या आणि डोळ्यांखाली लावा. १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग करावा.
मुरूम, पुटकुळ्या
तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावून १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
डेडस्कीन
डेडस्कीन काढून टाकण्यासाठी तांदळाचं पीठ, बेसन पीठ, मध आणि नाराळचं तेल मिक्स करून त्वचेला स्क्रब करा. १० मिनिटांनी अंघोळ करा.
त्वचेचा काळपटपणा
एक चमचा तांदळाच्या पिठात लिंबाचा रस मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावा. १५-२० मिनिटांनी मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका.
ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स
दही आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण करा. ही पेस्ट व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सवर अर्धा तास लावून ठेवा. १५-२० मिनिटांनी मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका.
शारीरिक दुर्गंधीपासून बचाव
तांदळाचं पीठ नॅचरल डिओड्रंट आहे. घामामुळे येणाऱ्या शारीरिक दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी पावडरप्रमाणेच तांदळाचं पीठ अंडरआर्म्सवर लावावं. थोड्या वेळानंतर पुसून घ्यावे.
उन्हापासून त्वचेचे संरक्षण
तांदळामध्ये पॅरा अमिनोबेन्झोइक अॅसिड सनस्क्रीनचे काम करते. तांदळाच्या पिठात थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट १० मिनिट चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.