त्वचा अधिक नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी दुधाची साय उपयुक्त आहे. बाजारातील कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा सायचा फेसपॅक वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. जाणून घ्या दुधाच्या सायीपासून फेसपॅक कसे बनवावेत –
कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक
एक चमचा सायीमध्ये एक चमचा मध मिक्स करा. हा फेसपॅक लावल्यानंतर 20 मिनिट्सने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि मुलायम बनते.
डेड स्किन हटविण्यासाठी फेसपॅक
ओटमीलमध्ये साय मिक्स करून त्वचेवर लावावा. १०-१५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करावी. यामुळे डेडस्कीन त्वरित निघून जाण्यास मदत होते. हा उपाय चेहऱ्याबरोबरच हातपायांच्या त्वचेसाठीही करावा.
चेहरा उजळण्यासाठी फेसपॅक
एक चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि साय मिक्स करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय करावा.
स्किन टॅनिंंगसाठी काढण्यासाठी फेसपॅक
केवळ साय चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा.
तसेच साय आणि बेसन मिक्स करून फेसपॅक बनवावा. हा फेसपॅक लावल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय करून पाहावा.