* रात्री झोपण्यापूर्वी १ तास चाला.

* झोपण्याआधी कोमट तेलाने हलक्या हातांनी डोक्याला मालीश करा. यामुळे रक्ताभिसरण उत्तम राहील आणि लवकर तसेच शांत झोप येईल.

* झोपण्याच्या ३० मिनिटे आधी मोबाईल, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रिनकडे पाहू नका.

* झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने मालीश करा.

* रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने अंघोळ केली तर थकवा दूर होऊन तुम्हाला रात्री शांत आणि निवांत झोप लागू शकते.

* रात्री जेवणात जास्त तेलकट आणि तिखट मिरचीचे पदार्थ टाळा. हलका व पोट भरेल असा आहार घ्यावा. उपाशी पोटी किंवा अधिक जेवण केल्याने शांत झोप लागत नाही.

* काश्याच्या वाटीने तळपायाला मसाज करावा.

* अतिविचार करणे टाळावे किंवा ताणतणाव देणाऱ्या गोष्टींवर अधिक चर्चा करू नये. झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करा. मेडिटेशन करा.

* झोपण्यापूर्वी एखाद छानस पुस्तक वाचायला घ्यावं.

* रात्री शांत झोप हवी असेल तर दुपारी झोपणे टाळावे.

* नियमित व्यायाम करा.

सतत भूक लागते? असू शकते ‘या’ आजारांचं लक्षण

मधाचे गुणकारी फायदे