विशेष करून उन्हाळा या ऋतूमध्ये शरीर लवकर थकते. सुस्तपणा आणि आळस जाणवतो. यामुळे शरीराची क्रियाशीलताही कमी होते. थोडे काम केले तरी लगेच थकवा येतो. अपुरी झोप, उष्णता, शरीराला योग्य पोषक घटक न मिळणे यांसारख्या असंख्य कारणांनी थकवा जाणवतो. त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी नेहमी योग्य आणि संतुलित आहार घ्यावा. जाणून घ्या कोणत्या पदार्थांमधून ऊर्जा लवकर मिळते आणि सुस्तपणा आणि थकवा जातो.
डाळिंब खा
रोज डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढते, अशक्तपणा जातो. तसेच थकवाही दूर होतो. अधिक प्रमाणात थकवा जाणवत असेल तर, डाळिंबाच्या दाण्यांमध्ये थोडी साखर आणि मीठ मिक्स करून खा.
सफरचंद
रोज सकाळी एक सफरचंद खावे. सफरचंदामुळे शरीराला ऊर्जा मिळतेच शिवाय रक्त वाढीसाठी मदत होते.
दही
उन्हाळ्यात रोज दुपारी एक वाटी दही अवश्य खावे. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते शिवाय पचनसंस्थाही व्यवस्थित राहते. पोटाचे आजार उदभवत नाहीत. आणि विशेष म्हणजे लवकर एनर्जी मिळते.
कलिंगड
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते तसेच कलिंगड थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते तसेच शरीराला ऊर्जाही मिळते.
तूप
नियमीतोने तूप खल्लास शरीराला पोषक घटक मिळतात तसेच वजनही नियंत्रणात राहते.