शांत आणि पूर्ण झोप घ्या
कमी आणि चुकीच्या झोपेच्या वेळेमुळे मेंदूचे आणि डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. शांत आणि पूर्ण झोप झाली तर डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे झोप शक्यतो वेळेवर आणि पूर्ण घेत चला.

डोळ्यांचा व्यायाम करा
डोळ्यांचा व्यायाम केल्याने डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कमी होते. दर एक तासाने वीस सेंकदासाठी डोळ्यांची उघडझाप करा अथवा वीस फूट लांब नजर टाका.

चहा, कॉफी कमी प्या
थकवा दूर करण्यासाठी अनेकजण अति चहा, कॉफी पितात. मात्र अती प्रमाणात चहा, कॉफी पिण्यामुळे डोळे सूजतात, डोळ्यांची जळजळ होते. तसेच शरीर शरीर डिहायड्रेट होते. परिणामी डोळे कोरडे पण पडू शकतात. त्यामुळे अती प्रमाणात चहा, कॉफी पिणे टाळा.

डोळ्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा
आजकाल सर्व काम लॅपटॉपवरच येऊन ठेपलेले आहे. त्यामुळे स्क्रीन टाइम वाढलेला आहे. परिणामी डोळ्यांवरचा ताण अधिकच वाढला आहे. लॅपटॉपवर किंवा मोबाइलवर कामाव्यतिरिक्त जास्त वेळ वायला घालवत बसू नका.

नियमित केळी खाण्याचे फायदे

लसूणच नाही तर, लसणाची सालही आहे गुणकारी