चरबी केवळ पोटावरच वाढत नाही तर ती चेहऱ्यावरही वाढते. चेहऱ्यावर चरबी वाढल्याने डबल चीनची समस्या निर्माण होते. डबल चीनमुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा ही लटकलेली दिसून येते. चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर शरीरातील फॅट्स कमी करावे लागतील. त्यासाठी संतुलित आहार तसेच व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. जाणून घ्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय
व्यायाम-१
चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर व्यायामात कार्डिओचा समावेश करा. यामुळे केवळ चेहऱ्याचीच नाही तर, शरीरातीलही चरबी कमी होते.
व्यायाम-२
या व्यायाम प्रकारात गाल फुगवणे, ओठ डाव्या-उजव्या बाजूला करणे, दातांवर दाब देऊन जबडा फिरवणे आदी हालचालींचा यामध्ये समावेश आहे. हा व्यायाम दिवसातून दोन वेळा करावा. एक महिन्यात परिणाम दिसू लागतात.
व्यायाम-३
ओ’ओ’ आणि ई’ई’ मोठं तोंड करून म्हणावे. यामुळे स्नायू ताणले जातील आणि चरबी कमी होईल.
व्यायाम-४
आधी मान उजवीकडे फिरवा आणि हनुवटीला खांद्याने स्पर्श करा, त्यानंतर डाव्या खांद्याने हनुवटीला स्पर्श करा.
आहार
हारात प्रथिने, खनिजे, फायबरयुक्त पदार्थ जसे की ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.
आहारात रिफाइंड कार्ब्सयुक्त पदार्थ,कर्बोदके, फॅटी फूड, तळलेले पदार्थ खाऊ नयेत तसेच आहारात सोडियमचं प्रमाण खूप कमी ठेवावं. सलाड अधिक प्रमाणात खावं. ग्रीन टीचे सेवन करावे.