मकर संक्रात 15 जानेवारीला सेलिब्रेट केला जात आहे. या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात. परंतु ते कसे बनवायचे हे अनेकांना माहित नसते. चला तर मग जाणून घेऊ तिळाचे लाडू बनवण्याची कृती….
साहित्य
– पांढरे तीळ – दोन कप
– गुळ – पाऊण कप
– तूप – एक मोठा चमचा
– वेलची पावडर – एक लहान चमचा
– भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम – दोन मोठे चमचे
……………………………..
– असे बनवा तीळाचे लाडू
– सुरूवातीला गॅसवर कढई ठेवा आणि तीळ भाजून घ्या.
– तुम्ही तीळ मिक्सरमध्ये बारीकही करू शकता.
– त्यानंतर चमचा भरून तूप घ्या ते गरम करा.
– त्यामध्ये गूळाचे तुकडे टाका.
– मग गूळ विरघळल्यावर त्यात वेलची पावडर आणि काजू बदाम टाका.
– आता भाजलेले तीळही त्यात टाका.
– आता लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे.
– गॅस बंद करा अन् गरम मिश्रणाचेच लाडू तयार करायला घ्या.
– लाडू वळण्यासाठी हाताला तूप लावा.