कच्ची कैरी वापरून बनविले जाणारे कैरीचे पन्हे( kairi panha) हे एक चविष्ट आणि आरोग्यवर्धक पेय आहे. उन्हळ्यात कैरीचे पन्हे सेवन केल्याने थकवा तात्काळ दूर होतो तसेच शरीराला इन्स्टंट एनर्जीही मिळते. तसेच पचनाशी संबंधित असणाऱ्या समस्याही कमी होतात. जाणून घ्या कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी
पद्धत-१
साहित्य
१ कैरी, अर्धा पेला साखर, २ चमचे मीठ, २ चमचे काळं मीठ, २ चमचे भाजलेली जीरे पावडर, २ चमचे बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि २ कप पाणी
कृती
कैरी व्यवस्थित धुवून घेऊन पातेल्यात शिजायला ठेवा. कुकरमध्येही शिजवली तरी चालेल.
कैरी आतून मऊ होईपर्यंत शिजवा.
थंड झाल्यावर, साल काढून टाका आणि गर काढून घ्या.
सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा आणि २ कप पाणी त्यात घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाण्याचे प्रमाण अवश्यकतेनुसार वाढवू शकता.
पद्धत २
साहित्य
१ कैरी, अर्धा कप साखर, १ चमचा वेलची पूड, चिमूटभर केशर
कृती
कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी. कैरी आतून मऊ होईपर्यंत शिजवा.
थंड झाल्यावर, साल काढून टाका आणि गर काढून घ्या.
साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा आणि त्यात केशर आणि वेलचीपूड कैरीचा गर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मिश्रण थंड झाले की काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावे.
सर्व्ह करताना एक ग्लास तांडा पाण्यामध्ये ३-४ चमचे कैरीच्या पन्ह्याचे मिश्रण घालून सर्व्ह करावे.