साहित्य

एक वाटी पांढरे तीळ, पाऊण वाटी साखर, जायफळ पूड, वेलची पूड

कृती

सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तीळ टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या.
नंतर हे तीळ एका काढून घ्या व तव्यावर साखर टाका साखर सतत हलवत रहा.
साखरेचा पाक बनला कि त्यामध्ये वेलची पूड व थोडसं जायफळ टाका तसेच तीळ टाकून ते हलवून एकजीव करून घ्या.
नंतर हे मिश्रण काढून घेऊन लाटून घ्या आणि त्याच्या छोट्या छोट्या पापड्या तयार करून घ्या.