भोगीची भाजी ही अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवली जाते. भोगीची भाजी खाल्ल्याने व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आणि कॅल्शियम सारखे पौष्टिक घटक मिळतात. भोगीची भाजी ही भाजी एक पौष्टिक आहार आहे.

साहित्य
एक बटाटा, एक वांगे, एक गाजर, अर्धी वाटी ताजे मटार, अर्धी वाटी हिरवे हरभरे, १०-१२ भिजवलेले शेंगदाणे, एक शेवगाची शेंग, दोन चमचे तिळकूट, ओलं खोबरं, चवीपुरते मीठ.
कृती
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, चिरलेला बटाटा, कापलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफवाव्यात. नंतर चिरलेले वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. भाज्या शिजल्यावर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावं.