संपूर्ण देशभरात 15 जानेवारीला मकर संक्रातीचा सण साजरा केला जात आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असतो. या दिवशी काळे कपडे परिधान केली जातात. तसेच तीळगूळ वाटले जाते. तीळाचे लाडू बनवले जातात. शिवाय पतंग उडवली जाते. परंतु पतंग का उडवली जाते हे अनेकांना माहिती नसते. यामागे धार्मिक कारणही आहे आणि वैज्ञानिकही.

  • असे सांगितले जाते की, जून्या काळातील मान्यतेनुसार पतंग उडवणे ही परंपरा भगवान श्री राम यांनी सुरु केली होती. भगवान श्री राम यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती आणि ही पतंग इंद्रलोकांपर्यंत पोहोचली होती. म्हणून या दिवशी पतंग उडवली जाते.
  • तर वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की, पतंग उडवल्याने आरोग्याला खूप फायदे होतात. पतंग उडवण्यासाठी बाहेर पडता तेव्हा सूर्यकिरणे अंगावर पडतात. त्यामुळे शरीरातील रोग नाहीसे होतात.
    • पतंग उडवण्यामागे आणखी एक कारण आहे. यातून एक चांगला प्रेरणात्मक संदेश मिळतो. ज्याप्रमाणे पतंग अगदी स्वतंत्रपणे आकाशात भरारी घेत जातो त्याच्यासारखंच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कायम उंच झेप घेऊन पुढे जात रहावं.