उन्हाळ्यात वातावरणामुळे शरीराची देखील उष्णता वाढलेली असते. त्यामुळे शरीराची उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात थंड पाण्यानेच अंघोळ करावी. तसेच उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे इतरही महत्वपूर्ण फायदे आहेत. जाणून घ्या उन्हाळ्यात थंड पाण्यानेच अंघोळ करण्याचे फायदे

दिवसभर ताजेतवाने वाटते
थंड पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभर फ्रेश वाटतं.

रक्ताभिसरणाचा वेग वाढतो
थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चरबी वितळते.त्यामुळे शरीराची कर्यक्षमताही वाढते.

ऑक्सिजनचे प्रमाण वाढते
थंड पाण्यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
थंड पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ताणतणाव कमी होतो
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो. जर तुम्हाला डिप्रेशन,नैराश्य जाणवत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते
थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.

शांत झोप येते
थंड पाण्याने अंघोळ केल्याने झोप चांगली लागते.