येत्या १५ तारखेला मकर संक्रातीचा सण आहे. हा सण सर्वत्र जोरात साजरा केला जातो. नव्या वर्षात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला सण असतो. या दिवशी बायका देवाला जाऊन ओवसा मागतात. तसेच या दिवशी पतंगही उडवली जाते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का या दिवशी काळे कपडे परिधान केली जातात. तसे आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो. परंतु मकर संक्राती दिवशी काळ्या रंगाची कपडे परिधान केली जातात. त्यामागे काही कारणेही आहेत. ते आपण जाणून घेऊया.
– या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांती म्हटले जाते. या वेळी दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. त्यामुळे मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात असे ज्योतिषशास्त्र सांगते.

– तर वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतो की, मकर संक्रांती हा सोल्स्टिसचा शेवटचा दिवस असतो अन् तो हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी काळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे. कारण इतर रंगांच्या तुलनेत काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो अन् त्यामुळे शरीर उबदार राहते.