दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र दूध कधी आणि कसे प्यावे यासाठी काही नियम आहेत. जाणून घ्या दूध पिण्याचे नियम आणि त्यामागील कारणे –

दूध नेहमी उभे राहून प्यावे. कारण उभे राहून दूध पिल्याने खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो, स्नायू मजबूत होतात. ह्रदयरोग आणि ब्लडप्रेशरपासून सुरक्षा मिळते.

तसेच दूध थंड किंवा कोमट दोन्हीही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. थंड दूध शरीरातील वात आणि पित्त नियंत्रित ठेवते. अवेळी पिण्यामुळे ते पचत नाही. शक्यतो दूध सकाळी आणि संध्याकाळी घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायचे असेल तर रात्रीचे जेवण लवकर करावे. त्यानंतर नंतर दोन तासांनी कोमट दूध प्यावे.