माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. त्यापैकी एक आहे ते मनुके (Raisins). शरीरात जेव्हा रक्ताची कमतरता जाणवते तेव्हा मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. काळे मनुक्यात त्यात जास्त औषधी मानले जातात. मनुक्याचे पाणीही (Raisins water) शरीरासाठी लाभदायक असते. मनुक्याचे आपल्या आरोग्याला नेमके काय काय फायदे आहेत, हे आपण पाहूयात. (Raisins water rid of these 4 diseases)

मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स(Antioxidants)आणि पोषक तत्व (nutrients) भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम फायबरचे प्रमाण पण अधिक असते.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

त्वचेसाठी गुणकारी
मनुक्याचे पाणी शरीरातील सर्व हानिकारक पदार्थ काढून टाकत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर होतो. औषधी असलेले हे मनुक्यातील पाणी त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.

बद्धकोष्ठतेवर प्रभावी
मनुक्याचे पाणी बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अत्यंत फायदेशीर असते. अनेकांची रोज पोट साफ होत नाही अशी तक्रार असते. अशा लोकांनी रोज सकाळी नियमित मनुक्याच्या पाण्याचे सेवन केले तर त्यांचे पोट पूर्णपणे साफ होण्यास मदत होईल. शिवाय बद्धकोष्ठ, गॅसच्या त्रासातूनही सुटका होईल. मनुक्यातील औषधी घटकामुळे या त्रासापासून आराम मिळेल.

हे ही वाचा ः  पुणेकरांनो सावधान, राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात; गेल्या २४ तासात आढळले नवे १३६ रूग्ण

शुक्राणूंची संख्या वाढते
तज्ञांच्या मते हे प्रजनन क्षमता सुधारण्यास मनुक्याचे पाणी मदत करते, यामुळे शुक्राणूंची संख्यादेखील वाढवते.

वजन कमी करण्यास मदत करते
मनुक्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यातील ग्लुकोज आणि फ्रक्टोज शरीराला ऊर्जा देतात. मनुक्याच्या पाण्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर शरीरात ऊर्जाही राहते.

असे तयार करा मनुक्याचे पाणी
1. दोन कप पाण्यात 150 ग्रॅम मनुके घ्या
2. हे पाणी रात्रभर झाकून ठेवा
3. सकाळी झोपेतून उठल्यावरून अनुशीपोटी हे पाणी प्या

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)