आपल्या शरीराला अत्यंत घातक असलेले धूम्रपान अनेक मोठया रोगांना आमंत्रण देऊ शकते. देशात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ते कमी व्हावे यासाठी जगभरात धुम्रपानाबाबत जनजागृती केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर 9 मार्चला धूम्रपान निषेध दिन साजरा केला जातो.
अनेकांना धूम्रपान सोडायचे असते. पण अनेकदा ते व्यसन होऊन बसल्याने ते सोडणे अवघड होते. मात्र, आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही फॉल्लो करण्याचा प्रयत्न केल्यास धुम्रपनासारखी हानिकारक सवय तुम्ही दृढनिश्चय करून कायमची मोडू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान किंवा तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते तुमच्या रक्तात उतरतात. निकोटीन तुमच्या फुफूसात, हृदयात आणि रक्त वाहिन्यांमध्ये जाऊन तुम्हाला नुकसानकारक ठरतात. धूम्रपान सोडण्यासाठी असे काय आयुर्वेदिक उपाय आहेत जे तुम्हाला व्यसन सोडण्यास फायदेशीर ठरतील.
1. आयुर्वेदनुसार, तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी ओव्याच्या बिया लिंबाच्या रसात टाकून त्यात काळे मीठ टाकून ते दोन दिवस ठेवून द्या. त्यानंतर या मिश्रणाचे सेवन तेव्हा करा जेव्हा तुमचे तंबाखू खाण्याचे किंवा धूम्रपान करण्याची इच्छा होईल. या मिश्रणाचे एक दोन महिने सेवन केल्यास हळूहळू तुमचे व्यसन कमी होईल आणि काही काळाने सुटेल.
2. तंबाखू खाण्याची सवय हळूहळू बँड होईल. तुम्हाला तंबाखू खाण्याची, धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यास तंबाखू ऐवजी तुम्ही बडीशेपचे खाडे सेवन करून तंबाखू खाण्याची इच्छा मारू शकतात. असे जर तुम्ही एक दोन महिने केले तर तुमचे व्यसन हमखास कमी होईल आणि हळूहळू बंद होईल.