आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शुद्ध हवा आणि पोषक आहार यांचा अभाव भासतो, त्यामुळे अनेकांना थकवा, श्वसनाचा त्रास किंवा रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची समस्या जाणवते. शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचण्यासाठी केवळ श्वास घेणे पुरेसे नाही, तर आपल्या आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश करणेही आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणती फळ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात. –
द्राक्षं (Grapes)
द्राक्षं हे अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्नने भरलेले असून ते रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवतात.
स्ट्रॉबेरी (Strawberries)
स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते जे आयरनच्या शोषणास मदत करते, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते.
किवी (Kiwi)
किवीमधील साखरेचे विघटन होताना शरीरात ॲसिड तयार होत नाही. या फळामधील साखर ही शरीरात अल्केलाईनचे काम करते. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते.
संत्री, मोसंबी, लिंबू (Oranges, Sweet Lime, Lemon)
संत्री, मोसंबी, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या फळांच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते.
पेर (Pear)
पेर या फळामुळे शरीरातील शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत मिळते.
अननस (Pineapple)
अननसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते.अननसमध्ये पीएच लेव्हल ही 8 पेक्षा अधिक असते त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.
आंबा, पपई (Mango and Papaya)
आंबा, पपई या फळांची पीएच लेव्हल 8.5 असते. तसेच या फळांच्या सेवनामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहते. तसेच पचनसंस्था चांगली राहते.
कलिंगड (Watermelon)
कलिंगडामध्ये सगळ्यात जास्त अल्केलाईन असते. त्यामुळे या फळाचा पीएच लेव्हलही 9 पर्यंत असते. त्यामुळे या फळाच्या सेवनामुळे ऑक्सिजन वाढण्यास मदत मिळते. तसेच या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा समावेश असतो.
जर्दाळू (Apricots)
जर्दाळूच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. शिवाय जर्दाळू पित्त कमी करण्यास मदत करते.
केळं (Banana)
केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील पेशींच्या ऑक्सिजन वापरात मदत करते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते.