‘एच३एन२’ने इन्फ्लुएन्झाचा प्रभाव असतानाच कोरोना देखील पुन्हा परतला आहे. राज्यात मागील २४ तासात ३४३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात ५१० रुग्णांची नोंद झाली असून नवे १३६ रूग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण १७०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तसेच ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात करोनाच्या १७०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता ७९२७ वर पोहोचली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.