पुणे : राज्यातील कोरोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंधाचा कालावधी देखील वाढवण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील कोरोनाची रुग्ण वाढ सुरुच आहे. याशिवाय पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात आज दिवसभरात 2 हजार 837 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 4 हजार 673 कोरोनातून बरे झाले आहे. ही दिलासी देणारी बाब आज पुणे शहरातून समोर आली आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे शहरात 36 हजार 586 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज मिळालेल्या रुग्णांबरोबर पुणे शहारातली कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 44 हजार 539 वर पोहचली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4 लाख 649 वर गेली आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी शहरात आतापर्यंत 7 हजार 304 रुग्णांचा कोरोना मृत्यू झाला आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 36 हजार 586 रुग्णांपैकी 1 हजार 403 रुग्ण गंभीर तर 6 हजार 402 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.