चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे इतर देशांतही कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहे. तसेच राज्यांनाही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच आता सरकारने भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लशीला गेल्या आठवड्यात परवानगी दिली.

त्यानंतर आता या लशीची किंमत ठरल्याचे समजत आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या वॅक्सिनची किंमत 800 रुपये आणि जीएसटी पाच टक्के असणार आहे. त्यामुळे साधारणता या लशीसाठी लोकांना हजार रूपये मोजावे लागतील.

ज्या लोकांनी कोरोना लशीचे दोन डोस घेतले असतील त्यांच्यासाठी बूस्टर डोस म्हणून या लसीचा वापर केला जाणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल.

नेझल वॅक्सिन म्हणजे काय?
नेझल कोरोना म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे.