पाइल्स (Piles) हा एक सामान्य आजार आहे. मात्र त्यामुळे होणार त्रास भयंकर असतो. अनुवंशिकता, वजन वाढणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या अनेक कारणांमुळे पाइल्सचा त्रास होतो. जाणून घ्या पाइल्स होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी –

भरपूर पाणी प्या
दिवसभर पुरेसे पाणी प्या.

फायबरयुक्त पदार्थ खावेत
फायबरयुक्त आहाराचे नियमित सेवन करावे. यामुळे आतड्यांसंबंधीचा ताण कमी होतो. आहारात भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांचा समावेश करा.

नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम करावा. चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या शारीरिक हालचाली कराव्यात.

चुकीच्या सवयी बंद करा
रात्री अति जागरण करू नये.
दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणे टाळा.
अधिक प्रमाणात जंक फूड, तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळा.