सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट सुरू आहे. काही ठिकाणी तर पारा इतका घसरला आहे की लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तसेच सध्या थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. देशात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते. अति थंडीत रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते.

थंडीत ही काळजी घ्या हार्ट अटॅकचा धोका होईल कमी


– तुम्हाला जास्त अल्कोहोल पिण्याची सवय असेल तर त्यावर नियंत्रण मिळवा.
– धुम्रपान करण्याची सवय असलेल्या लोकांनीही ते कमी केले पाहिजे.
– झोप पूर्ण न होणे हेही हार्ट अटॅकचे कारण होऊ शकते. शरीरासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे हृदय चांगले राहते.
– तुम्ही घेत असलेल्या आहारावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आहारात मीठ, साखर आवश्यक तेवढे घ्यावे.
– दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. व्यायाम हा दररोज केला पाहिजे. दररोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम केलाच पाहिजे.