काही लोक असे असतात ज्यांना व्यायाम करताना अथवा व्यायाम केल्यानंतर डोकेदुखीची समस्या निर्माण होते. जाणून घ्या व्यायाम केल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरू होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय –

१. गरम वातावरणात किंवा उंचावर किंवा बंद खोलीत व्यायाम केल्यानंतर लोकांना प्राथमिक शारीरिक डोकेदुखी होण्याची शक्यता असते.
२. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा त्यामुळे मेंदूला होणारा रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे शरीराला हालचाल करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो पण या काळात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाणही वाढते आणि आपल्या मेंदूला उष्णतेपासून मुक्ती मिळणे आवश्यक असते. याचा सामना करण्यासाठी, आपल्या रक्तवाहिन्या पसरतात आणि या विस्तारामुळे वेदना होऊन डोकेदुखी होऊ शकते.
३. शारीरिक श्रमाला ऊर्जा देण्यासाठी तुमचे स्नायू साखरेचा इंधन म्हणून वापर करतात. कठोर कसरत दरम्यान, तीव्र शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते. यामुळेही डोकेदुखी होऊ शकते.

डोकेदुखी टाळण्यासाठी उपाय –
१. कधीकधी व्यायाम करणे थांबवल्यानंतर थोड्या वेळात डोकेदुखी बरी होते. जेव्हा तुमच्या हृदयाची गती कमी होते आणि मेंदूची ऑक्सिजनची मागणी कमी होते तेव्हा ही डोकेदुखी सहसा एक किंवा दोन तासांत बरी होते.
२. परंतु जर तुमची डोकेदुखी शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होत असेल, तर पुरेसे पाणी प्यावे. पाणी पिल्यानंतर काही वेळात डोकेदुखी बरी होऊ शकते.
३. कार्बोहायड्रेट खाल्ल्याने कमी रक्तातील साखरेमुळे किंवा हायपोग्लायसेमियामुळे होणारी डोकेदुखी बरी होऊ शकते.