माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांच्याच झोपेवर परिणाम झाला आहे. मात्र झोपेवर परिमाण झाल्याने आपल्याला अनेक आजारांना, त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी रोज रात्री किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. केवळ जीवनशैलीतील बदलांमुळेच नाही तर आहारातील बदलांमुळेही झोपेवर परिणाम होतात. परंतु, झोपेसंबंधित आजारापासून तुम्हाला दूर राहायचे असेल तर रोज रात्री मूठभर पिस्ता (Pistachios) खाल्यास त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. काय आहेत हे फायदे आपण जाणून घेऊ.. (Pistachios Help You Sleep Better)

आहारात फळे, सुका मेवा यांचा मुबलक प्रमाणात समावेश केला तर तुम्ही झोपेच्या समस्यांपासून दूर राहू शकतात. पिस्ता हा शांत झोपेसाठी एक सर्वोत्तम पदार्थ ठरला आहे. पिस्त्यामध्ये मेलाटोनिनचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे शांत व गुणवत्तापूर्ण झोप लागण्यासाठी मदत होते.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

पिस्त्यातून शरीराला मिळणारी पोषक तत्व ः
– शरीराला मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 मिळते. त्यामुळे गामा, ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिनचे उत्पादन सुलभ करते. सेरोटोनिनचे उत्पादन ट्रायप्टोफॅन या अमिनो आम्लावर अवलंबून असते. आयुर्वेदानुसार पिस्त्यामध्ये वात-शमक गुण असतो, ज्यामुळे चिंताग्रस्त, निद्रानाश, लठ्ठपणा दूर राहण्यास मदत होते. शिवाय पिस्ता ह्रदयविकारावरही चांगला असतो.

झोप वाढविणारी आयुर्वेदिक औषधे
– ब्राह्मी, जटामांसी, शाखपुष्पी, तगर, अश्वगंधा ही औषधी वनस्पती झोप वाढविण्यास मदत करतात. तसेच या औषधांच्या सेवनाने तणाव दूर होण्यासही मदत होते. ही औषधी वनस्पती पाणी किंवा दूधासह रोज झोपताना घ्यावी. यामुळे निद्रानाश, झोप, अतिविचार यापासून मुक्ती मिळेल.

हे ही वाचा ः  पुणेकरांनो सावधान, राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात; गेल्या २४ तासात आढळले नवे १३६ रूग्ण

पिस्त्यामुळे कोणते आजार दूर होतात?
– शांत झोप लागते
– झोपेची गुणवत्ता सुधारते
– शारीरिक आरोग्य सुधारते
– मानसिक आरोग्य उत्तम राहते

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)