चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर अनेकांना टेन्शन येतं. तसेच पिंपल्स आल्याने चेहरा खराब दिसायला लागतो. मग पिंपल्स आल्यावर अनेकजण विविध उपाय करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का पिंपल्स घालवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यामुळे देखील तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या चुका टाळा.

फेसवॉश करू नका
जेव्हा पिंपल्स येतात त्याचं मुख्य कारण तेलकट त्वचा हे असते. मग असे लोक चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी विविध फेसवॉश वापरतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशा लोकांनी टिश्यू पेपर घ्यावा अन् चेहऱ्यावरील तेल काढून टाकावे.

उशाचे कव्हर न बदलणे
जेव्हा त्वचेवर पिंपल्स वा पुरळ येतात तेव्हा उशीचे कव्हर बदलत जा. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा उशीचा कव्हर स्वच्छ असला पाहिजे हे लक्षात ठेवा. आठवड्यातून किमान दोनदा उशीचे कव्हर बदलण्याचा प्रयत्न करा.

चेहऱ्याला सारखा स्पर्श करू नका
पिंपल्स आल्यावर अनेकजण वारंवार चेहऱ्याला अन् पिंपल्सच्या ठिकाणी स्पर्श करतात. परंतु असं करणं चुकीचं आहे. पिंपल्सला वारंवार स्पर्श केल्याने पिंपल्स वाढण्याचा धोका असतो. यामुळे चेहऱ्यावर डागही येऊ शकतात.

वाफ घेणं टाळा
चेहऱ्याला वाफ घेतल्याने खूप फायदा होतो हे सर्वांना माहिती आहे. परंतु पिंपल्स आल्यावर ते घेणं चुकीचं आहे. याचं कारण म्हणजे पिंपल्सच्या वेळी वाफ घेतल्यास ते छिद्र मोठे करते, त्यामुळे या छिद्रांमध्ये जास्त तेल जमा होऊ शकते.