माझं आरोग्य टीम (Maz arogya team) ः पूर्वीपासून लोक जेवणानंतर विड्याचे पान खाणे पसंत करतात. खरंतर पान जेवणानंतर खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. पचन न होणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या अनेकांना उद्भवत असतात. अशा समस्यांवर विड्याचे पान प्रभावी उपाय ठरते. विड्याचे पान कोणकोणत्या समस्यांवर परिणामकारक आहे हे आपण जाणून घेऊयात… तसेच रात्री जेवणानंतर पान झाल्यानंतर काय करायला हवे हे ही पाहूयात… (Pann eating is good For human Health)
पचनक्रिया सुधारण्यासाठी
– पचन न होणे, भूक न लागणे अशा समस्या अनेकांना उद्भवत असतात. मात्र, यावर विड्याचे पान अत्यंत उपयुक्त ठरते. विड्याच्या पानामध्ये एन्झाईम, अँटिऑक्सिडंट्स आढळते. जे पोट साफ करून भूक वाढवण्यास चालना देते. पान खाताना दात, तोंड आणि लाळीतील ग्रंथींचा उपयोग होत असतो. ही लाळ पचन सुधारण्यासाठी आणि भूक नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
निरोगी दातांसाठी प्रभावी
– दात निरोगी ठेवण्यासाठी विड्याचे पान खाणे फायदेशीर ठरते. मात्र ते योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे. पान खाताना दातांचा व्यायाम होत असतो. शिवाय त्यामुळे दात स्वच्छ देखील होत असून कॅविटीचा धोका घटतो. परिणामी दात निरोगी राहतात.
हरड्या निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी
— पान खाल्ल्याने हिरड्या देखील मजबूत राहतात. अनेकांना हिरड्यातून रक्त येण्याची समस्या असते. अशांसाठी विड्याचे पान प्रभावी उपाय आहे. यामुळे हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होते. शिवाय तोंडाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरते.
रात्री पान खाल्ल्यावर हे नक्की करा
– अनेकांना रात्री जेवल्यानंतर दररोज पान खाण्याची सवय असते. पान पचनास उत्तम असल्याने ते खावे. मात्र, पान खाल्ल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे. दात स्वच्छ घासून झोपल्यानंतर तुमच्या दातांना पानाचे योग्य गुणधर्म मिळू शकतीत.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)