स्टायलिश आणि रुबाबदार दाढी दिसण्यासाठी अनेक जण बियर्ड ऑईलचा वापर करतात. मात्र याव्यतिरिक्तही बियर्ड ऑईलचे आणखी काही फायदे आहेत. जाणून घ्या बियर्ड ऑईलचे इतर फायदे –
अँटीबॅक्टिरिअल आणि अँटीसेप्टिक
दुखापत किंवा खरचटलेल्या ठिकाणी तुम्ही बियर्ड ऑईल लावू शकता. कारण बियर्ड ऑईलमध्ये नैसिर्गिकरित्या अँटीबॅक्टिरिअल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. तसेच जखम लवकर भरुन काढण्याची क्षमता असते.
केस मजबूत आणि चमकदार बनतात
ए, सी, आणि ई व्हिटॅमिनसह अँटीऑक्सीडेंट आणि ओमेगा-6 फॅटी एसिडची मात्रा असते. यामुळे बियर्ड ऑईल डोक्याच्या केसांसाठीही उपयुक्त आहे. बियर्ड ऑईलच्या वापराने केस मजबूत आणि चमकदार बनतात. केस मऊ होऊन व्यवस्थिती सेट होतात.
कोरड्या त्वचेवर गुणकारी
त्वचा कोरडी पडत असेल तर बियर्ड ऑइल लावल्याने त्वचा मॉइश्चरायझ होण्यास मदत होईल. बियर्ड ऑइलमध्ये व्हिटॅमिन सी,ई आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.