बिस्किट हा प्रकार लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. ओरियो बिस्किटपासून देखील स्वादिष्ट असे मोदक बनवता येतात. जाणून घ्या ओरियो बिस्किटपासून मोदक बनविण्याची रेसिपी –

साहित्य

४ पुडे ओरियो बिस्किटे
३-४ चमचे दूध
३-४ चमचे मिल्कमेड किंवा मलाई
२ चमचे नारळाचा किस

कृती
ओरियो बिस्किटमधून क्रीम काढून बाजूला ठेवा.
आता बिस्किटे बारीक करून त्याची पावडर बनवा. ते मिसळण्यासाठी त्यात दुधाची साय आणि दूध घालून पीठ तयार करा. नारळाचा किस आणि ओरियो क्रिम दोन्ही चांगले मिक्स करुन सारण बनवून घ्यावे.
या सारणाचा पीठाचे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात ठेवून मोदक बनवून घ्या.